महसाम् बद्दल आभार. द्बिधा बद्दलचे आपले म्हणणेही सत्य आहे. पण मी शुमंच्या प्रतिसादाला उत्तर देण्याचा प्रयत्न करत होते. धा धातूचे धरणे , धारण करणे इ. अर्थ तर सर्वश्रुतच आहेत. पण त्याचा दा सारखाच देणे हाही एक अर्थ आहेच.
हा श्लोक आमच्या दहावीच्या संपूर्ण संस्कृतच्या पाठ्यपुस्तकात होता. मी पुणे विद्यापिठाचीच द्विपदवीधर असले तरी आमच्या दोन्ही कागदप्रदान सोहळ्यात हा श्लोक ऐकलयाचे आठवत नाही. कदाचित तो श्लोक लावायची प्रथा आता बंद झाली असेल किंवा श्लोक लावलेला माझ्याच लक्षात आला नसेल.
मूळ मुद्दा बहुदा किंवा बहुधा यातील बरोबर शब्द कोणता हा आहे आणि सवयीने बहुदा असे कानाला बरोबर वाटते आहे.
(या चर्चेनंतर मिळालेल्या बौद्धिक आनंदामुळे काही प्रमाणात ताण नक्की कमी झाला आहे हे आवर्जून नमूद करावेसे वाटते.)