वरील चाललेली चर्चा जाता जाता वाचली आणि काही लिहावेसे वाटले.
वरील सर्व चर्चा प्रमुख्याने इंग्रजी शब्दांना असणाऱ्या प्रतिशब्दांबद्दल चाललेली दिसून आली. थोडासा विशाल दृष्टिकोन (broader perspective :)) ठेवल्यास इतर भाषांसह या गोष्टिकडे पाहिल्यास आणि त्याच वेळेला आपल्याच भाषेतील "भाषांतर" व "अनुवाद" (अनुताईंचा नव्हे हं!) यांचे शब्दार्थ लक्षात घेतल्यास विषयाच्या व पारिभाषिक-सामाजिक-ऐतिहासिक-सांस्कृतिक.......इ.इ. संदर्भांनुसार बदलणाऱ्या अर्थानुरूप "अनुवाद" करताना अनेक प्रतिशब्दांची योजना आवश्यक आहे हे दिसून येइल. आणि माझ्यामते इथे अनुवादाच्या दृष्टिनेच चर्चा सुरू आहे.
उदा. वृकोदर महाशयांनी वापरलेला शब्द पाहू.
(जाता जाता- इंग्रजीतही अनेक शब्द ग्रीक-लॅटीन-फ्रेंच वगैरे भाषांतून जसेच्या तसे आले आहेत.)
स्टँडर्ड (ना.)- इयत्ता, दर्जा-गुणवत्ता,
स्टँडर्ड(वि.)- सर्वसंमत - सर्वग्राह्य ( बोली भाषेत स्टँडर्ड फिटिंग वगैरे म्हणताना) दर्जामानांकित
स्टँडर्डाईझेशन - सर्वमान्यता-सर्वमतसिध्दता, दर्जामानांकन, ....
याशिवाय काही नामवाचक शब्दांची उत्पत्ति एखाद्या प्रदेशानुसार-परिस्थितीनुसार- किंवा ती वस्तू तयार करणाऱ्या व्यक्तिच्या विशेषनामावरुन झालेली असते त्यांचे भाषांतर होऊ शकत नाही व अट्टाहासाने अनुवाद केल्यास हास्यास्पदही ठरु शकतो. (उदा. सँन्डविच)
काव्यकलांसारखे रंजक किंवा कलात्मक अभिव्यक्तिचे प्रकार वगळता कोणत्याहि भाषेचा उपयोग हा केवळ अर्थवाही म्हणूनच केला जात असतो, त्यामुळे इतर भाषांमधील रुढ व ज्यांचा अर्थ आहे तसाच अधिक संवेद्य आहे त्या शब्दांना ओढुनताणून प्रतिशब्द शोधण्यात तथ्य नाही असे वाटते. (उदा. डिस्प्ले कार्ड- रॅम- व असेच संगणकीय व इतर अनेक विषयांतील बहुतांश पारिभाषिक शब्द की ज्या विषयांची उत्पत्ति वा चर्चाच मुळी मराठीत यापूर्वी झालेली नाही.)
बरेच बकलो. आता थांबले पाहिजे. वेळेअभावी जाउनयेउन केलेल्या लिखाणात तुटकपणा असण्याचा संभव आहे. तरि क्षमस्व.