मी सध्या भारताबाहेर आहे आणि माझ्याबरोबर काही सहचारी आणि सहचारिका पण आहेत. मी असे पाहिले की बरेचजण रोज लॅपटॉप /भ्रमणध्वनीवरून तासन तास बोलत असतात. आणि बोलून बोलून काय बोलतात की आज मी हि भाजी केली, आज मला ५ मिनीटे उशिर झाला, म्हणजे कदाचित ऐकणाराही वैतागत असेल (पण तसे दाखवत नसेल). या बोलण्याचा आम्हाला त्रास, कारण ह्या गप्पा रात्री चालतात. एखादेवेळी ठिक आहे पण रोज म्हणजे जरा अतीच होते ना..?
आहे त्या सोयी किती वापराव्यात त्याला काहीतरी बंधन असणे जरुरीचे आहे. हाच फरक आहे संस्कृतीत.
इथे मला तुम्हाला नाराज करायाचे नाही पण बाकी लेख खरच चांगला आहे. पुढिलवेळी लक्षात ठेवा. कदाचित आत्ता नाही पण नंतर तुम्हाला या गोष्टी पटतील. मी भ्रमणध्वनी या तंत्रग्यानात काम करित असल्याने त्याचे फायदे आणि तोटे मला माहित आहेत.