प्रथम, स्वामीजी, आजानुकर्ण सर्वांना धन्यवाद.
हा विषयच असा आहे की प्रत्येक सल्लागाराचं मत खरं नि वेगळं असू शकतं.
माझा मुख्य छंद चित्रफितींचं संपादन नि देवनागरी लेखन वाचन. यांपैकी High Definition चित्रफितींसाठी एखादं जोरकस यंत्र हाताशी हवं म्हणून मॅकबुकाची निवड केली होती. तुम्ही दिलेल्या सल्ल्यांनुसार त्यांपैकी प्रत्येक प्रणाली किमान एकेकदा तरी डोळ्यां - हातांखालून घालणं भाग आहे त्यानंतरच निर्णय घेता येईल.
आता प्राथमिकतः मी असं समजतो की लिनक्स वा मॅक यां दोन्हींमध्ये देवनागरी लेखन वाचनाला कोणती अडचण येऊ नये, पण चित्रफीतीसंपादनासाठी शक्तिशाली यंत्र हवं असेल तर मॅक जास्त उपयुक्त ठरावं.
आणखी कुणाची मतं समजल्यास आनंद वाटेल ...