पल्लवीसमीर, आजानुकर्ण, VJ, चक्रपाणि, चक्रधर१, प्रतिसादाबद्दल अनेक आभार!

VJ, डाळीच्या पीठात कोथिंबीर चिरून घातल्याने एक वेगळाच स्वाद येतो. मी बटाटेवडे करताना पण डाळीच्या पीठात कोथिंबीर घालते. तसेच बटाटेवड्याचे सारण पण कच्चेच ठेवते, त्याची भाजी करत नाही. वेगळी छान चव येते.

चक्रपाणि, मी आत्तापर्यंत भजी करताना कधीच खाण्याचा सोडा घातलेला नाही. वरील प्रमाणात सोडा घालायचा असेल तर चिमुटभर पुरेल असे वाटते. सोडा घातल्याने भजी खूप तेल पितात. सोड्याला पर्याय म्हणजे थोडे तेल कढल्यात खूप गरम करून डाळीच्या पीठात घातले तर भजी कुरकुरीत होतात. शिवाय डाळीच्या पीठामध्ये थोडे तांदुळाचे पीठ घातले तरी पण भजी कुरकुरीत होतात. मी उपहारगृहात किंवा गाडीवर कधीच भजी खाल्ली नाहीत त्यामुळे चवीत नक्की कोणता फरक असतो हे माहीत नाहीत. हे माहीती करून घेण्याकरता खास बाहेरची भजी खाऊन पाहिली पाहिजेत.

रोहिणी