दि | वे | ला | ग | ण |
म | णी | कां | च | न |
ती | सं | ता | प | व |
बो | हा | री | ण | नि |
त | र | त | री | त |
वरदाताई,
याही वेळी क्लू अवघड करण्यासाठी बादरायण संबंध जोडून लिहिले असल्याचे जाणवले. विशेषतः क्लू शब्दाकडे अचूकपणे घेऊन जाणार नाही किंवा दिशाभूल करेल असाच देण्याचा प्रयत्न केल्यासारखे जाणवले. वाचकांची मुद्दाम दिशाभूल करून कोडं अवघड करणं हे काही बरोबर नाही. उदा.
१ सूर्य बुडताच जोरात संसर्ग झाला. (५) ठीक आहे
११ योगायोगाने एकाच माळेचे सोन्याने मढले. (५) हेही ठीक आहे
२२ संपाचा मारा नि रागाचा पारा. (३) याचा संतापाशी काय संबंध आहे? ताप म्हणजे रागाचा पारा नव्हे.
३१ बोरीला हाण । कपडे आण ॥
भांड्यांचे वाण । ठाण ठाण ठाण ॥ (४) याचे उत्तर बोहारीण आहे हे ओळखायला शेरलॉक होम्सच हवा!
(बाय द वे, मणीकांचन आणि बोहारीण एकत्र पाहून गंमत वाटली)
४१ मग गुंतलात तरी पद्धत पाळून हुशार व्हाल (५) या शब्दाचा क्लूशी काय संबंध आहे हे मला समजावून सांगाल काय?
१ राक्षसांच्या आईला बुद्धी होऊन तिने चांगली बडदास्त ठेवली (३) मी अदिती असल्यामुळेच हे दितीचे कोडे सुटले. पण नुसता दिमती असा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. या शब्दाबद्दल अधिक माहिती करून घ्यायला आवडेल.
२ "आई गऽ! वैतागले ह्या केसांना!! "
"अगं, भट्टनारायणाचं पाहून त्यांना मारून का टाकत नाहीस? " (५) हे भारी होतं. हासिल-ए- जल सारखं हासिल-ए-पहेली म्हणता येईल.
१३ काळे मणी पवित्र? दारा भार्या कलत्र ॥ (२) इथेही क्लू आणि शब्द यांचा संबंध काय?
१४ वनात रोज करतो चोरी । ओशट तोंड पांढरे करी (४) इथे तर केवळ अंदाजपंचे दाहोदर्से या न्यायाने शब्द ओळखता आला. जर शब्दकोडे तपासायची सोय नसती तर कठीण झाले असते.
२४ जळण आणताना पाऊस पडून गेला तर मनाचा निश्चय होतो. (२) जळण, पाऊस , मन , निश्चय आणि पण यांचा परस्परसंबंध स्पष्ट कराल काय?
३३ "म्हणून मी उलट सांगत होते. वागण्याची काही पद्धत असते की नाही? " (२) हेही सही होतं हे आवडलं.
--अदिती