श्लोकात आलेल्या 'धेहि'चा दे असा अर्थ असता तर मह्यम् किंवा मे धेहि असे झाले असते. (ज्याला द्यायचे त्याची चतुर्थी.) तसे नाही त्याअर्थी 'धा' धातूचा देणे हा अर्थ इथे अभिप्रेत नाही.
मराठीच्या दृष्टीने विचार केला तर 'बहुदा' बहुदा चालायला हवा. मराठी शुद्धलेखनावर ग्रंथ लिहिणारे अरुण फडके आणि यास्मिन शेख यांना कळवायला पाहिजे. या दोघांनाच नाही तर, वरदा वैद्यांनाही सांगायला पाहिजे. निष्कारण शुमंनी त्यांच्या 'बहुदा'ची चूक काढली.
आणखी एक विचार. संस्कृतमध्ये यदा, तदा, एकदा ही अव्यये आहेत, तसे 'बहुदा' नाही. तिथे 'दा' हा देणारी अशा अर्थानेच आला आहे. मराठीत दोनदा, दहादा, शंभरदा हे शब्द आहेत. इथे 'दा' हा मराठी प्रत्यय आहे. तो फक्त मराठी शब्दांना लावायला पाहिजे. 'बहु' मराठी नाही. म्हणून पुकळदा, खूपदा चालेल, पण 'बहुदा', 'अतिदा' चालणार नाहीत. ('एकदा'चा अपवाद सोडून द्या, कारण 'एक' हा जितका संस्कृत आहे तितकाच मराठी. त्याला निव्वळ मराठीत वेगळा शब्द नाही.--अद्वैतुल्लाखान.