पाचही भाग आत्ता वाचले. साध्या शब्दात चांगले लिहिले आहे. एकेकटीने सगळ्या गोष्टी करताना काय काय वाटले ते सांगण्याचा प्रांजळपणाही आवडला.
थेट नोकरीच्या प्रशिक्षणासाठी घराबाहेर राहण्याची वेळ लेखिकेवर आल्यामुळे ते फार जाणवले असावे असे वाटले. रोजच्या संपर्काबाबतीत सहमत. मी घराबाहेर पडून आता १२ वर्षे झाली तरी रोज काही ना काही संपर्क (जालावर निरोप, गप्पा किंवा मग फोन) होतोच.