मॅकवरून स्कायपातून बोलताना आवाज मध्ये मध्ये गायब होतो. म्हणजे ऐकू येत नाही. यावर एखाददोन उपाय ऍपलच्या स्थळावरून उतरवून घेतले, त्याने थोडा फरक पडला पण तरी प्रश्न कायमचा सुटलेला नाही. गमतीची गोष्ट म्हणजे 'रिस्टार्ट' केल्यावर थोड्यावेळापुरता आवाज पुन्हा काम करू लागतो. अगदी विंडोजसारखेच.
मी सध्या इंटरनेट वापरासाठी विंडोज व कामासाठी लिनक्ससारखे सेंटओएस (CentOS) असे वापरते आहे. सेंटओएस मध्ये युनिकोडित पाने मला अजुनतरी नीट वाचता येत नाहीत.