केवढा काळोख आहे माजलेला
सूर्य या शहरात दिसतो गोठलेला!...
दुःख हलके वाटले इतके मला का?
भार होता मी सुखाचा पेललेला...
जायचे होते मला का तरिही पुढे?
माहिती नव्हता कुणी मज परतलेला...
हे तीन शेर विशेष आवडले. सुखाचा भार पेलणे तर खासच! कुणीही परतून आले नसल्याची कल्पनाही किंचित वेगळी वाटली. आवडली.
दुसऱ्या शेरात 'नव्हता इलाजच' कानाला खटकले; गुणगुणताना अडखळायला झाले. महेशरावांनी केलेल्या सुचवणीबाबत - म्हणजे त्या विशिष्ट ओळीबाबत - असेच काहीसे झाले. मी म्हटलेल्या ओळीत सध्या जे आहे त्याऐवजी 'पर्याय नव्हता' हे सुचले. वजनात बसते, चांगले वाटेल, अडखळायला होणार नाही, असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.