प्रिय योगीडॉल,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद! माझा लेख तुम्हाला आवडला ह्याबद्दल आभारी आहे.

रोज फोन मी माझ्या नवऱ्याला करत असे. आणि एकमेकांपासून दूर राहण्याचे दुःख जर फोनमुळे थोडेफार हलके होत असेल तर तसे करायला काहीच हरकत नाही, नाही का? आणि शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे मला वाटते. तुमची घरच्यांशी किती अटॅचमेंट आहे ह्यावर ते अवलंबून आहे.

तुमच्या माहितीसाठी : माझ्या फोनचा कोणालाही त्रास होत नसे. फोन कसा व किती वापरावा ह्याची मला चांगली जाण आहे. माझे इतर भारतीय सहकारीही रोज घरी फोन करत असत.