कल्मष म्हणजे डाग, घाण, पाप(नामे) किंवा पापी(विशेषण). कल्माष म्हणजे काळिमा. यावरून मराठीतला 'किल्मिष' हा या दोन शब्दांपासून आला असण्याची दाट शक्यता आहे. 'किल्बिष'पासून अपभ्रंश होऊन आला नसेलही.  शिवाय, मशि/मषि/मसि/मशी/मषी/मसी म्हणजे शाई, काजळ, घाण, मळ इत्यादी. 'किल्मिष'च्या व्युत्पत्तीत या शब्दांचाही वाटा असेल.---अद्वैतुल्लाखान