मेरा टेलिफून नही लगता (यम टी यन येल) वालेही फसवणूकीबाबत मागे नाहीत !
एस टी डी व लोकल फोनच्या दरांत त्यांनी ज्या दिवशी कपात केली त्याच्या आदल्याच दिवशी योगायोगाने मी ७५० चे टॉप अप केले होते. ह्यात मला १००० चा टॉक टाईम चा मिळतो आधीचा ३९. ६५ चा उरलेला व नवा १००० चा अशी १०३९. ६५ ची शिल्लक असलेला समोसा (लघूसंदेश)  त्यांनी पाठवला होता. हे लघूसंदेश आपले टॉ. टा. किती दिवस चालले ह्याचा अंदाज येण्यासाठी मी पुढचे टॉपअप करेस्तोवर जपून ठेवतो.
दुसऱ्या दिवशी अचानक दरांत कपात केल्याची बातमी वर्तमानपत्रांतून व ट्रम्प च्य जाहिरातींतून वाचून आनंद झाला. आठवडा गेल्यावर सहज चाळा म्हणून बाकी तपासली तर चक्क ३८५ व सुटे पैसे होती. ऐकण्यात चूक झाली की काय असे वाटून लघूसंदेशामार्फत तपासली तर  तोच आकडा संदेशात आला ! माझा साधारण मासीक उपभोग १०००-१२०० च्या आसपास होतो. घरी सगळ्यांकडे विचारणा केली म्हटले न जाणो सौ ने चूकून (किंवा डोळा चूकवून) बहिणीला लांबचा कॉल केला असेल - पण मग खरा गोंधळ लक्षात आला - पत्रव्यवहार सुरू केला आहे पण मला नाही वाटत काही निष्पन्न निघेल. ६५०/- च्या फरकापैकी २५० -३००/- चा वापर केला असे जरी गृहीत धरले तरी मेल्यांनी मला ३५० - ४०० चा चूना लावलेलाच होता.
अनेक वर्षांची थकबाकी गिळंकृत करणाऱ्या मंत्री, नेत्या-पुढाऱ्यांची थकबाकी सर्वसामान्यांकडून वसुलायची ही ह्यांची नवी पद्धत असावी.

फसवा-फसवी पासून वाचायचे असल्यास बिलींग कार्ड घेणेच सोयीस्कर असेच आता वाटते.