काल माझ्या तळमायन्यामध्ये दिसणारे (वाचक की वचक  ) हे वाक्य हा प्रशासनाने मला दिलेला फिशपाँड किंवा कोपरखळी होती की काय? असा प्रश्न पडला आहे. तसं असेल तर पॉईंट वेल सेड आणि वेल टेकन!
हॅट्स ऑफ टु यू प्रशासक आणि महेशराव!

पूर्वी टंकलेखन करताना एखादं अक्षर जोडाक्षर करायचं असल्यास त्यात अ हा स्वर न मिसळता पुढचं व्यंजन मिसळल्याने काम होत असे. हल्ली कुठल्याही अक्षरात अ आपोआप मिसळला जातो आणि जोडाक्षरासाठीचा हलन्त वेगळा मिसळावा लागतो असं लक्षात आलं आहे. जुनी सोय उत्तम होती. ती पुनरुज्जीवित करता येऊ शकेल का? उदा. ःऍटस हा शब्द लिहिताना ह ऍ ट स या कळा दाबल्याने काम होत असे त्या ऐवजी आता ह ऍ ट हलन्त स असे लिहावे लागते. ही बहुदा जावास्क्रिप्टची किमया असावी.

--अदिती