केशवसुमारांच्या 'दैनंदिन लेखन' ह्या प्रतिसादाशी सहमत असा प्रतिसाद द्यायचा होता. प्रथम तेथे 'नावाची नोंदणी करा' वगैरे आले. (मी येण्याची नोंद करूनच ह्या पानापाशी आलो होतो. मग मी 'जाण्याची नोंद' केली, परत 'येण्याची नोंद' केली. व परत ह्या पानापाशी आलो. आता केशवसुमारांच्या त्याच प्रतिसादावर टिचकी मारल्यावर हे दिसलेः

"दैनंदिन लेखन नवीन प्रे. केशवसुमार (शुक्र., २९/०८/२००८ - ०९:०८).

वॉर्निंगः इनवॅलिड आर्ग्युमेंट सप्लाईड फोर टोरीच() इन /होम/मनोगत/पब्लिक_एचटीएमएल/डी६२/मॉड्युल्स/फेच_अ.अक्ष_कॉमेंट. पी. एच. पी. ऑन लाईन ८९

एरर इन गेटिंग द कॉमेंट"

हे तांत्रिकी झाले. पण मूळ मुद्दा हा होता की दैनंदिन लेखात एक रकाना मूळ लेखकाच्या नावाचा असला तर बरे होईल.