'बहु' हा सुट्टा शब्द मराठी गद्यांत येत नाही. बहुभाषी, बहुरूपी, बहुगुणी असा संस्कृतमधून आलेल्या शब्दांत आला तरच. पद्यांत मात्र, मात्रांच्या वा गेयतेच्या सोयीसाठी किंवा गोडवा निर्मितीसाठी संस्कृत, हिंदी, फार्शी शब्द मराठी पद्यांत येतात. "सुंदर व संपन्न देश बहु असले तरी माझा महाराष्ट्र मला प्रिय आहे.. " असे कुणी मराठीत बोलताना म्हणत नाहीत किंवा लिहीत नाहीत.
'बहु' मूळ संस्कृत आहे यासाठी पाहा:
प्रभूतं प्रचुरं प्राज्यं अदभ्रं बहुलं बहु । पुरुहू: पुरु भूयिष्ठं स्फारं भूयश्च भूरि च ।। अमरकोश(३. १. ६३)
याशिवाय संस्कृतमध्ये 'बहु' अशा अर्थी पुढील शब्द आहेत: अति(शय), अत्यंत, अधिक, अनेक, पुष्कल, पुरहम्, पुरुहम्, बहुतिथ, स्फिरम् इ. इ.
आणखी पाहा:
बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन । तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप ।। गीता(४. ५)
बहुजनहिताय बहुजनसुखाय ।। (दीर्घनिकाय १. १. ६. ६५)
------------------
बहवो न विरोधव्या: दुर्जया: हि महाजना: । स्फुरंतमपि नागेंद्रं भक्षयन्ति पिपीलिका: ।।
बहूनाम अपि असाराणां संहति: कार्यसाधिका । तृणैर्विधीयते रज्जुर्यया नागोSपि बध्यते ।।
बहव: पुरुषा: लोके सततं प्रियवादिन: । अप्रियस्य च सत्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभ: ।।
---अद्वैतुल्लाखान