समजा अदितींच्या आग्रहास्तव 'बहु' हा मराठी काव्यातच येणारा गोड शब्द 'पुष्कळ' अशा अर्थाने आपण मराठी गद्यात स्वीकारला तर, बहुदाचा अर्थ (दोनदा, दहादा प्रमाणे)पुष्कळवेळां असा होईल. म्हणजे हा शब्द बहुधाच्या 'बहुतेक' अशा अर्थाचा होणारच नाही.
यास्तव बहुधा असेच लिखाण योग्य. सुखदा(सुख देणारी), वरदा(आशीर्वाद देणारी)प्रमाणे जेव्हा खूप देणारी असा अर्थ असेल तेव्हाच बहुदा वापरायचे!--अद्वैतुल्लाखान