मराठी ही भाषा आहे.  भाषा म्हणजे जी बोलली जाते ती. आता तुम्ही देवनागरीत पाट्या लावा असे म्हणाल तर ठीक आहे 
कारण मराठी भाषा लिहिण्यासाठी देवनागरी  लिपीचा उपयोग केला जातो.  

पण गडबड अशी आहे की देवनागरी हा शब्द कोणालाच नको आहे कारण त्याने मराठी भाषिक आणि हिंदी 
भाषिक ह्या दोन्ही प्रकारच्या नेत्यांची दुकाने चालणार नाहीत आणि हो वृत्तवाहिन्यांना तरी तिखटमीठ लावलेला 
मालमसाला कुठून मिळणार.  कारण देवनागरी म्हटले तर अनेक जणांच्या तलवारी म्यान होतील.  मग 
निवडणूकीपर्यंत आपली पोळी भाजायला राहिला कुठला मुद्दा?