मृदुला, माधवराव, अदिती, प्रतिसादाबद्दल अनेक आभार!
पाऊस व भजी ह्यांचं नातं अगदी अतूट आहे. पाउस पडायला लागला की भजी करण्याचा मोह टाळता येत नाही!
मृदुला,
मी पूर्वी भजीपीठात मोहन घालायचे . आता कमीत कमी तेल खाणे कसे करता येईल या प्रयोगात मोहन घालत नाही. भजी पीठामध्ये कोथिंबीर म्हणजे दिसायलाही छान दिसतात आणि वेगळाच स्वादही येतो. भजी थोड्या प्रमाणात तळली आणि तेल उरले तर मी दुसऱ्या दिवशी त्यामध्ये भाजी करते. खूप प्रमाणात तळली गेली आणि तेल उरले तर मी ते तेल वापरत नाही. शक्यतोवर तळायचे तेल जास्त होणार नाही याची काळजी घेते. पीठ भिजवताना पाणी जास्त होणार नाही याची काळजी घेते, अगदीच जास्त झाले तर परत डाळीचेच पीठ घेते. पूर्वी मी भजीपीठात थोडे तांदुळाचे पीठ घालायचे त्याने भजी कुरकुरीत होतात.
सर्वांना परत एकदा मनापासून आभार.
रोहिणी