"रितेश ट्रेडर्स, यहाँ प्लायवूड, फेविकोल, एवं फर्निचर का अन्य सामान मिलेगा"

सध्या जो वाद चालू आहे तो मराठी नामफलकाविषयी. वरील वाक्यात "रितेश ट्रेडर्स" हे नाव आहे आणि "यहाँ प्लायवूड, फेविकोल, एवं फर्निचर का अन्य सामान मिलेगा" ही जाहिरात.  

मात्र जाहिरात कुठल्या भाषेत करावी ह्या विषयी कोणताही कायदा नाही.  त्यामुळे "रितेश ट्रेडर्स" हे नाव मराठी 
आणि हिंदी दोन्ही भाषिकांना आपलेच वाटेल ह्यात शंका नाही.

मात्र वाद निर्माण होईल तो नामफलकातील  ब्वॉय, प्वाँइंट अशा शब्दांमुळे. कारण हे शब्द मराठी उच्चाराप्रमाणे नाहीत.