-

'कायदा पाळत नसण्याबाबत' हरकत घेण्याचा अधीकार कूणाचा असू शकतो? तर तो असतो शासक संस्थेचा. कारण कायदे, नीयम त्यांनीच बनवलेले आहेत.

जर बृहनमूंबई महानगर पालीका (शीवसेना + भा‍‍.ज.पा.  ) वा महाराष्ट्र शासन संस्था (काँग्रेस + रा.काँ.) यांना  'कायदा पाळत नसण्याबाबत' कोणतीही हरकत नसेल तर कोणत्याही इतर मंडळीं ना स्वतःच्या हातात दगड-काठ्या घेवून हरकत घेण्याची गरज काय?

इतकी वर्ष वीना मराठी पाट्याच्या दूकानात मराठी माणूस खरीदारी करीत होताच ना? मग आताच कशी मराठी संस्कृती धोक्यात आली?

'मराठी-मराठी' असं करणं हे आप-आपसात ठीक आहे. पण त्याचा असा गाजावाजा करण्याने 'मराठी भाशा' हा इतर भाषीक व प्रांतीयांसाठी थट्टेचाच वीशय होण्याचा धोका वाटतो.