७ मुले आणि किमान ५६ मेंढ्या.
रीत: घोडे सात त्याअर्थी मुले सात किंवा कमी. सात धरूया. त्यांची नावे फ, ई, ड, क, ब, अ, आणि क्ष. मेढ्या ७ क्ष. धाकट्या(सातव्या मुलाला) क्ष मेंढ्या मिळाल्या, बायकोला शून्य. सहाव्या मुलाला आणि बायकोला मिळून क्ष मेंढ्या. म्हणजे पाचव्या मुलाने आणि सुनेने घेतल्यावर २क्ष मेंढ्या उरल्या होत्या. त्यातल्या समजा अ सहाव्या मुलाने घेतल्या. उरल्या (२क्ष - अ). बायकोला मिळाल्या (२क्ष - अ)/९. पण सहाव्या मुलाला आणि सुनेला मिळून क्ष मेंढ्या मिळाल्या होत्या.म्हणजे अ+(२क्ष - अ)/९ = क्ष. सोडवून क्ष/८= अ/७. ५ व्या मुलाने त्या वेळी उरलेल्या ३क्ष मधून समजा ब मेंढ्या घेतल्या होत्या. म्हणजे.... ब+(३क्ष-ब)/९=क्ष . म्ह. क्ष/८=ब/६. असेच क्ष/८=क/५. थोडक्यात क्ष/८=अ/७=ब/६=क/५=ड/४=ई/३=फ/२. साती मुले झाली. क्ष ही संख्या आठाच्या पटीत, समजा, ८. म्ह. अ=७; ब=६; क=५; ड=४; ई=३ आणि फ=२ आणि क्ष=८. एकूण मेंढ्या ८*७=५६. वाटणी अशीः
नाव: मुलाला+बायकोला= एकूण. फः २+६=८; ईः ३+५=८; डः ४+४=८; कः ५+३=८; बः ६+२=८; अः ७+१=८; क्षः ८=०=८. घोडे ७ प्रत्येक मुलाला एक.
---अद्वैतुल्लाखान