फायरफॉक्सवर मला लोकसत्ता वाचायला नेहमी अडचण येते. त्यांचा वरूण फॉण्ट उतरवून घेतल्यावर आय ई मध्ये प्रत्येक पान व्यवस्थित मराठीत दिसायचे. मात्र मी आय ई वापरणे सोडून दिल्याने आता फाफॉवर मला लोकसत्ताचे प्रत्येक नवीन पान उघडले की कॅरॅक्टर एंकोडिंग बदलून (युजर डिफाइंड) वेस्टर्न करावे लागते, म्हणजे मराठी लिहिलेले व्यवस्थित दिसते. बाकी युनिकोडित स्थळे आणि मटा वाचायला काही त्रास नाही. लोकसत्तासाठी काय करता येईल?