धन्यवाद प्रतिसादांबद्दल.

ही रचना अष्टाक्षरी होत आहे, हे मलाही माहीत नव्हते. प्रतिसादांमुळे कळले.

असे घेऊन गं रंग, क्षण अवचित् येतो   असे हवे होते. मूळची ओळ हीच होती.
पण लिहिताना मला वाटले, की 'गं' हे अक्षर उगीच येत आहे. मी ते वगळले.

प्रतिसादांमुळे आता ते ठेवण्याची प्रेरणा मिळाली. 'गं' या अक्षरामुळे ती ओळ अष्टाक्षरी होईल. सध्या ती सात अक्षरांची आहे.
ओळ अशी वाचावीः असे घेऊन गं रंग, क्षण अवचित् येतो.