<लेखकाने असे वागणे स्तुत्य का आणि कसे ते कळले नाही.> असो; तो आपला दृष्टिकोन आहे.

अशी (दूषित पाणी वगैरे) घटना भारतात घडती तर लेखक तसेच वागला असता का? वागू शकला असता का? त्याला प्रतिसाद कसा मिळाला असता?> अर्थातच होय! कुठल्याही देशात असे वर्तन हे अयोग्यच आहे आणि ते इथे भारतात घडले असते तरीही मीच हीच भूमिका घेतली असती. मागे एकदा ठरलेल्या सेवेत कसूर केल्याबद्दल मी व माझा सहकारी यांनी वांद्र्याच्या लँडस एण्ड कडून लेखी माफी मिळविली होती.

प्रतिसाद कसा मिळाला असता हे सांगणे शक्य नाही मात्र अशा लोकांना वठणीवर आणणे कठिण नसते. आणि जेव्हा एखादा लढा आपण वैयक्तिक कारणास्तव देत नसतो, जेव्हा त्यामागे आपला स्वार्थ नसतो तेव्हा आपल्याला ताकद येते आणि मदतही मिळते व मग प्रतिसाद अर्थातच मिळतो.

भारतात असे काही घडल्याचे आपण कधीच ऐकले नसावेत हे आश्चर्यच आहे. गेल्या महिन्यात नित्कृष्ठ माल वापरला तसेच गिऱ्हाईकाने बटाटावड्यात झुरळ सापडल्याची तक्रार करुनही दाद न देणाऱ्या ठाण्यातल्या एका प्रसिद्ध हॉटेलवर कारवाई झाल्याचे आपण वर्तमान पत्रात वाचलेले दिसत नाही :)