वृकोदर महाशय,

स्टँडर्डायझेशन = प्रमाणीकरण.

आशुतोष,

ही यादी 'सर्वसमाविष्ट' नसून 'सर्वसमावेशक' नाही असे तुम्हाला म्हणायचे असावे.

यजुवेंद्र,

प्रचलित अर्थ आणि शब्द नेहमीच अर्थवाही असतात असे नाही तर कधीकधी भाषेला कलंक बनून राहतात अशीही उदाहरणे आहेत.

उदाहरणार्थः भर पुण्यात मी विचारल 'का हो, एरंडवन कुठे आहे?'

उत्तरः 'एरंडवन' नाही पण 'एरंडवणा' कोथरुडजवळ आहे!

आता घ्या! मूळ 'एरंडवना' चे इंग्रज प्रभावात 'एरंडवणा' झाले, ते नाव आपले लोक इंग्रज गेल्यावरही टाकून द्यायला तयार नाहीत.

तेव्हा, भाषाशुद्धीच्या प्रत्येक प्रयत्नाची अत्यंत गरज असून अशा प्रयत्नांना कमी लेखू नका ही आग्रहाची विनंती!