कौंतेय, तुमचे म्हणणे पटले.
मात्र हल्ली भारतात सर्वच हस्तसंचांना देवनागरी लिखाणाची सोय असते. (का हा माझाच फक्त अनुभव आहे? )
मला खालील मराठी शब्द सहज वापरता येतील असे वाटते. तुम्ही काय म्हणता?
हँडसेट = हस्तसंच
मोबाईल = भ्रमणध्वनी
सेलफोन = पेशीध्वनी
फोन = दूरध्वनी
इंटरनेट = आंतरजाल
स्क्रीन = पडदा, दर्शनपटल
लो एंड = निम्नश्रेणी
हाय एंड = उच्चश्रेणी
मेन्यू = पर्यायसंच
इनपुट = दिलेली (माहिती), दत्त
आऊटपुट = निष्पन्न (झालेली माहिती)
320 x 240 pixels = ३२० x २४० चित्रबिंदू
एस. एम. एस. = लघुसंदेशसेवा
एम. एम. एस. = बहुमाध्यमसंदेशसेवा
मॉडेल्स = आवृत्ती
ई-मेल = विद्युत निरोप, विरोप
ब्ल्यू-टूथ = निलदंत