भारतीय भाषांना नजरेआड करण्याची कुठल्याही नफेखोराला हिम्मत होऊ नये अशी परिस्थिती निर्माण करण्याची जबाबदारी आपली आहे.

मराठी नसेल तर कोणतीही गोष्ट झीडकारण्याची वृत्ती जोपर्यंत बाणवत नाही तोपर्यंत तरी हे  कसं काय बूवा शक्य आहे?

नवं तंत्रज्ञानाने यूक्त असलेला हस्तसंच बाजारात आला की आपण जूना उपयोगात असणारा हस्तसंच बदली करून घेतो कारण तो जूना वाटू लागतो. तरमग नव्याचं फॅड कसं काय सोडायचं?

तंत्र असो वा तंत्रज्ञान असो आपण परावलंबीच आहोत.  वीक्रेते मंडळी नवं तंत्र वीकसीत करून दूसरा वीक्रेता त्याचप्रकाराचं तंत्र बाजरात आणाणायच्या आधी आणण्यावर भर देणार. व आपण ही कधी ते बाजारात येतंय व कधी एकदा मीरवतोय ह्याची वाट पाहणार. जगाच्या बाजारात आपण नीव्वळ ग्राहकच आहोत, उत्पादक/ शोधक नाही. आपण शीकतो ते फक्त चांगली नोकरी मीळवण्यासाठी, मीळवलेला पगार चांगल्या गोष्टींवर खर्च करण्यासाठी, नव-नवे शोध मराठी भाषीकांसाठी लावण्यासाठी आपण शीक्शण नक्कीच घेत नाही.

मराठी भाशेचा नव-नव्या तंत्रातून वापर केला म्हणजे मराठी भाषेचा वीकास होणार असं आपण समजावं का?  व दूसऱ्यांचाही तसाच ग्रह करून द्यायचा का?

नव-नव्या तंत्राचा वापर करण्याने नसून नव-नव्या तंत्राचा शोध मराठी भाषेतून लावण्यानेच मराठी भाषेचा वीकास होणार. व त्याकरीता शोध लावण्यापूरता पैसा साठण्यासाठी  मनाने संकचीत होवून अनेक आर्थिक व्यवहार हे आप-आपसातच ठेवावे लागतील.

एस. एम‌. एस. बाबत म्हणायचं झालं तरं जोपर्यंत मराठी भाषेसाठीचं 'डाटा एनकोडींगचं तंत्रज्ञान' व त्यावर आधारीत इतर संगणक आज्ञावली एखादा मराठी माणूस वा एखादी मराठी धार्जीणी संस्था स्वतःहून वीकसीत कऱून (पैसे घेवून) उपलब्ध करत नाहीत तोपर्यंत ह्याबाबतीत आपण परावलंबीच राहणार.

अथवा केबल वरील परदेशी चीत्रपटांपासून अनेक इलेक्ट्रॉनीक वस्तूं मधील भाषेसंदर्भातील गोष्टी मराठीतूनच हवं असल्यास  ('उत्पादक होता येत नाही म्हणून) 'ग्राहक' म्हणूनतरी मराठी माणसाला संघटीत व्हावे लागेल.