रोहिणी,

पाककृती मस्त आहे. अभिनंदन.

डोशाच्या पिठात ऐनवेळी एखाद टेबलस्पून चण्याचे पिठ (बेसन) घातल्यास डोसे जास्त लालसर-पिवळे होतात.

डोशांवर तेल घालण्यापेक्षा अमूल बटर घातल्यास डोशे अधिक चविष्ट होतात. (कॅलरीज तेवढ्याच)

तसेच, वरील प्रमाणात १/२ वाटी जाडे पोहे आणि पाव चमचा मेथी दाणे भिजतानाच घालून वरीलप्रमाणे पिठ बनविल्यास उत्तम 'सेट डोसे', साधा उत्तप्पा, कांदा-टोमॅटो उत्तपा, चीझ उत्तप्पा करता येतात. मात्र सेट डोसा, उत्तप्पा बनविताना बेसन घालू नये.