अमेरिका या देशाविषयी स्वतःची अशी बरीवाईट मते असणारे किमान दोन प्रकारचे लोक आहेत. एक प्रकार म्हणजे अमेरिकेने सरसकट भारावून जाऊन अमेरिकेचे जे जे आहे ते ते सगळे थोर असे नतमस्तक लोक. दुसरे म्हणजे अमेरिकेचा घाऊक तिटकारा करणारे लोक. पहिल्या जमातीविषयी प्रश्नच नाही. ती बहुमतात असलेली आणि सतत वाढत राहणारी जमात आहे.
पटले. वाढत जाणारी आहे म्हणून बहुमतात आहे असे म्हणता की काय?
दुसऱ्या प्रकारच्या लोकांना अमेरिका आणि अमेरिकन लोक यांच्याविषयी काही वेगळी - म्हणजे चांगली माहिती मिळाली तर - त्यांचा अमेरिकेविषयीचा तिटकारा - कमी होईल असे नाही -पण जास्त वस्तुनिष्ठ होईल - असे काहीसे या पुस्तकाने साध्य होईलसे वाटते.
पहिल्या प्रकारच्या माणसांना काही वेगळी माहिती मिळाली तर त्यांचे मत बदलेल का?