गजल आवडली.
मी कोंडले दुःखास या कोणास ना जाणू दिले
हे एवढे जमते मला, आहे तसा निष्णात मी
वाटे किती, भेटू तुला, सांगू तुला, का मी असा?
का राहतो मागे तरी? का नेहमी पश्चात मी? हे दोन शेर विशेष वाटले.
तुमच्यात मी? माझ्यात मी?... असे काफिये मतल्यात आल्यावर रस्त्यात, इतक्यात इ. काफिये नियमाप्रमाणे योग्य आहेत. अज्ञात, निष्णात बरोबर नाहीत. अर्थात नियमाला पळवाट किंवा गालिबने सांगितलेली वाट अशी की काफियांबद्दल निश्चिती (अलामती- संबंधी वगैरे) मतल्यात नाही तर किमान पहिल्या शेरात व्हायला हवी. हा नियम मराठीत ग्राह्य असल्यास या गजलचे काफिये चूक नाहीत.
अजब