तुमचे सांत्वन करावयांस शब्द मिळत नाहीयेत.  गदिमा म्हणतात,  

"जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासतो तें सारें विश्व नाशवंत
अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात...
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा
जरामरण यांतून सुटला कोण प्राणिजात?
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत?
दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ
क्षणिक तेंवी आहे बाळा, मेळ माणसांचा

दैवजात दुःखे भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा..."