करमणूक करणारी सूचना. हस्त म्हटल्यावर प्रथम आठवते ते हस्त.... प्रक्षालन! हस्तसंच हा शब्द कुणाला अश्लील वाटला तर काय घ्या? आणि भ्रमणध्वनी आणि पेशीध्वनी यातला फरक काय बुवा? आणि पेशीध्वनी हे एखाद्या रोग्याचे लक्षण वाटते त्याचे काय? 'अचानक तिचा पेशीध्वनी वाढला म्हणून इस्पितळात दाखल ( पर्यायी शब्द? )  करावे लागले' वगैरे. निम्नश्रेणी आणि उच्च्श्रेणी वाचून क्षणभर आपण सरकारी कर्मचारी झालो आहोत असे वाटले. इनपुट म्हणजे दत्त हे बाकी सगळ्यात थोर. 'या गुरुवारी मी नृसिंहवाडीला इंपुटदर्शनाला जाणार आहे' हे चालेल का? नीलदंत हे ऐकल्यावर जोरात 'मोरया रे बाप्पा' म्हणावेसे वाटते. बाकी चालू द्या...