'इनपुट'ला दत्त, तर मग 'आउटपुट'ला काय? गुत्त, बत्त, मत्त, हत्त....?

रावसाहेबांच्या खिल्लीशी संपूर्ण सहमत. ह्याच संदर्भात चीनचे उदाहरण घेतलेले बरे. त्यांच्या मूळ चित्रलिपीत हजारो संकेत-शब्द (कॅरॅक्टर्स) होती. हे सर्व सामान्य जनांना कठीण होते, म्हणून तेथल्या सरकारने त्यातील बरीच काढून टाकली. चीन (पी. आर. सी.) त जी चिनी लिपी वापरली जाते, ती अशी सुटसुटीत केलेली आहे. तिला इंग्लिशमध्ये 'सिंप्लिफाईड चायनीज' म्हणतात. काही इतर देशात अजूनही जुनी लिपी चालते-- तैवान, सिंगापूर वगैरे. तिला 'ट्रॅडिशनल चायनीज' लिपी म्हणतात.

आपला रोख ह्याच्या उलटा का? भाषा सुटसुटीत, आम जनतेला वापरण्यायोग्य करायची, की उगाच क्लिष्ट बनवायची? सरकार जाऊन शासन आले, श्रेण्या आल्या, आता नीलदंत इ. येऊदे. कुठेतरी बुलढाण्यातील खेड्यात हा असला वापर केल्यावर बहुधा समोरचा विचारणार, 'ह्ये नील.. का काय ते काय समज्लं नाय! ' मग तुम्ही त्याचा अर्थ सांगितल्यावर तो तुम्हाला ऐकवेल ' अरे तिच्यायला, म्हंजी आपलं ब्लू टूथ म्हणा की. काय राव, गरिबाची थट्टा करता? सरळ बोला ना!!