माधवराव,

आपल्या विचारांशी मी अगदी सहमत आहे.

-जोवर दुकानावर किंवा कुठल्याही अस्थापनावर राज्यातल्या राजभाषेचा फलक असणार नाही तोवर "आम्ही येथले कायदे पाळत नाही" असला बेमुर्वतखोर संदेश तेथल्या स्थानिक जनतेला पोहचवला जातो / अशी भावना व्यक्त होते.

हे बरोबरच आहे. इतर राज्यांमध्ये (कर्नाटकात तरी) दुकानांच्या नावाच्या फलकावर प्रादेशिक भाषेतील नाव मोठ्या अक्षरात आणि (इंग्रजीमध्येही नाव लिहायचं असल्यास) त्याखाली लहान अक्षरात इंग्रजीमध्ये असतं. बंगलोरसारख्या शहरातही 'कन्नड' भाषा बहुप्रमाणात वापरली जाते, रेडिओवरची बडबडही कन्नडमधून असते. त्यांना त्यांच्या प्रादेशिक भाषेची अजिबात लाज वाटत नाही. आपल्याकडे मात्र (मुंबईत तर जास्तच) मराठी माणूसच मराठी बोलायला कचरतो, त्याला मातृभाषेचीच लाज वाटते.

-माझ्या मते कमीत कमी मराठीत संवाद साधण्याचा प्रयत्न तर करा जेणे करून स्वतःच्या मातृभाषेशी प्रामाणीक राहिल्याचे आत्मिक समाधान तरी मिळेल...

खरंय...