खिल्ली छानच उडवलेली आहे. मजा आली. रावसाहेब त्याखातर धन्यवाद.
मात्र खिल्लीच्या कसोटीच्या निकषावर खरे उतरलेले इतर शब्द मंजूर झालेले दिसतात. हेही नसे थोडके.
हस्तसंच शब्द अश्लील वाटणाऱ्याच्या मनात आहे, तेवढे त्या मूळ शब्दातच काही नाही हो!
"पेशीध्वनी" या शब्दाचा उद्देश प्रतिसाद मिळवण्याचाच होता.
तो आपल्या प्रतिसादानेच साध्य झाला आहे.
उच्च आणि निम्न केवळ सरकारात नसते. मनोगतावरही आहेच की.
मग या अर्थाने मनोगतही सरकारीच म्हणायचे का?
'या गुरुवारी मी नृसिंहवाडीला इंपुटदर्शनाला जाणार आहे' >>
छे! छे!! हे काय भलतेच? तुम्हीच मदत करा बुवा हा तिढा सोडवायला.