प्रदीपजी मी आपल्याशी प्रतिसादातील तथ्यांशापुरता सहमत आहे.
मात्र कित्येकदा सिंपलीफिकेशनच्या प्रयत्नात आपण आपलीच भाषा विसरत असतो.
तशी आठवण आपल्याला इतर भाषिकच करून देतात.
असाच एक किस्सा मला इथे सांगावासा वाटतो.
मी पहिल्यांदा मुंबईत आल्यावर कँटीनमध्ये रांगेत उभा होतो.
मला कांदा हवा होता. साऊथ इंडियन माणसाला, इंग्रजी समजेल या अदमासाने मी ओनियन मागितला.
तो माझ्याकडे काहीच न समजल्यागत पाहू लागला.
मग वाटले हिंदीत सांगितल्यास कदाचित समजेल. म्हणून मी 'प्याज'ची मागणी नोंदवली.
पण प्रतिसाद शून्य. शेवटी हे हवंय. म्हणून कांद्याकडे बोट दाखवले.
त्यावर तो म्हणाला 'तो फिर कांदा बोलो ना!'
अशा प्रकारे मला मराठीच पुन्हा शिकण्याची पाळी आली.
इतर भाषिक शब्द वापरण्याच्या नादात अशी पाळी पुन्हा कुणावरही न येवो.
तुम्हाला काय वाटते?