अगदी नेमके बोललात.
उदा.
'प्रदीपजी' हे संबोधन मराठी नाही. प्रदीपराव, प्रदीपसाहेब, प्रदीपपंत, प्रदीपशेठ, रा. रा. प्रदीप, श्री. प्रदीप वगैरे मराठी संबोधने असावीत असे वाटते. कन्नडमध्ये जसे अवरु, किंवा रि, तेलुगूमध्ये जसे गारु वापरले जाते तसे मराठीत साहेब, राव वगैरे एके काळी वापरले जात होते.
किंबहुना मराठीत बहुसंख्य वेळा फक्त 'प्रदीप' असे लिहूनही आदर दाखवला जातो. मात्र प्रदीपजी हे नक्कीच मराठी नाही. मराठीत अशी हांजी हांजी करण्याची पद्धत नाही.