मी माझ्या फोनवर मराठी भाषेचा वापर करतो (नोकियाचा कोणतातरी फोन आहे. नंबर लक्षात नाही ) त्यात लिहिलेल्या अनेक प्रतिशब्दांची मला खरे तर कीव येते. (उदा डावीकडची कळ दाबली असता मला फोन लाजायला सांगतो) पण या सर्व गोष्टींसाठी मराठी न वापरणे मला योग्य वाटत नाही. मला आज नोकियाला मेल लिहून सुधारणा सुचवणे शक्य नाही. पण जर मराठीत फोन वापरणारे ग्राहक वाढले तर हे दोष आपसूकच हळूहळू कमी होतील. (जशी विकीची माहिती कोणीही बदलू शकत असला तरी ती बहुतांशी बरोबरच असते). माझ्या ज्या मित्रांकडे मराठी अक्षरे उमटत नाहीत त्यांना मी लक्षात ठेवून इंग्रजी संदेश लिहितो. (ती सोय नेहमीच असते)

मुद्दा हा की कसेही असले तरी आपण मराठीत वापरायला सुरुवात केली पाहिजे.