नरेंद्र, आपण किती वर्षे मुंबईत राहत आहत, हे मला माहिती नाही. पण ३-४ वर्षे काढल्यावर आपल्या लक्षात आले असेल की, तो दाक्षिणात्य जे बोलला, ते मराठी नसून खास 'मुंबईचे हिंदी' होते. 'मै हळ्ळूच आगे खसक गया रे' हे ते आम्हा मुंबईकरांचे हिंदी! म्हणजे त्या कँटिनवाल्याने तुम्हाला सरळ मुंबई हिंदी वापरा ना राव, असे थोडक्यात सांगितले!! कायको खालीपिली भय्यलोगका हिंदी बोलता तुम इधर?

भाषा सोप्पी करायची ती अशा अर्थाने की अगदी खेड्यातील माणसालाही ती सहज समजली पाहिजे. अन्यथा संवाद कसा होणार आपला त्याच्याशी? इंग्लिशमधील तांत्रिकी शब्दांना मराठी प्रतिशब्द असावेत का, ह्याविषयी अलिकडेच मनोगतावर एक चर्चा होऊन गेली आहे. तेव्हा त्याच विषयाची पुनरावृत्ती नको. पण थोडक्यात मला असे वाटते की ज्या संकल्पनाच मुळात बाहेरून आपल्याकडे आल्या, त्यांना त्यांचीच मूळ भाषेतील नावे असावीत, आणि हेही आपण अनेक वर्षे बिनभोबाट करत आलो आहोत. कधीकधी एखाद्या शब्दाचा अपभ्रंश होतो, तोही सर्वसामान्य मराठी व्यक्तिला सोयिस्कर असावा म्हणून. स्टेशन/ ठेसन, फलाट, टायम, फोन ही काही ठळक उदाहरणे.

बाकी, मूळ लेखातल्या भावनेशी मी सहमत आहे.