कायद्यात पळवाट शोधणारे काही महाभाग युक्ती म्हणून एकाने आत जाऊन वस्तू खरेदी करायची आणि दुसऱ्याने एसी लावून रस्त्यावरच गाडीत थंड पडून राहायचे असे करतात. हे चुकीचे आहे.
आमच्या ओळखीच्या एकाने अमेरिकेत विमानतळावरून बायकोला आणताना ही युक्ती करून पाहिली. पण पोलिसांनी त्याला थांबू दिले नाही. सारखे फिरत ठेवले. तसे पुण्यात करणे अवघड आहे. कितितरी पोलीस ह्यालाच लागतील.