वा. उकडीचे, पांढरेशुभ्र, लुसलुशीत मोदक कोणाला आवडत नाहीत?
आमच्या इथे एक कुळकर्णीकाकू राहायच्या. दर गणेशचतुर्थीला त्या मला नुसते मोदक खायला बोलवायच्या. पण अट एकच, २१ मोदक खायचे. त्या काळी मोदकही बटाटेवड्यासाऱखे मोठ्ठे असायचे. (बटाटावडा, त्या काळातला. हल्ली तो ही लहान झालाय) त्यांचा मुलगा (माझा मित्रच) खाऊ शकायचा नाही. मी खायचो. असो.
आमच्याकडे वरील सारणात खवाही घालतात. छान चव येते. (पण कॅलरीज भरपूर वाढतात)