निवासी संकुलांच्या आसपास हॉर्नवर बंदी आहे. तुम्ही पोलिसांना विचारू शकता. (माझ्या समोर एकाला एकदा पोलिसानं दंड केला होता.)
मीही तुमच्यासारख्याच अवस्थेतून गेलो आहे. माझी मुलगी ३ महिन्यांची असताना घरासमोर रात्री १२ नंतरही गर्बा चालायचा.
अर्थात, ही बाब लोकांना जोपर्यंत स्वतःला पटत नाही, तोपर्यंत कायद्याचाच त्यातल्या त्यात उपयोग व्हावा.
मी स्वतः मुंबई-पुण्यातही गेली अनेक वर्षं हॉर्न न वाजवता आणि अपघात न करता गाडी चालवतोय. हे मी मनोगतावरही लिहिलंय पूर्वी.
(एक माझाच शेर आठवला... )
'घेतले ऐकून त्यांनी बोलणे, पण-
बोलणे पटण्यास थोडा समय आहे... '
- कुमार