कागदावर उमटलेले एखादे टिंब पाहिले की वाटते ते काय असावे? नुसतेच टिंब, की पूर्णविराम, की गुणिले चिन्ह, की दशांश चिन्ह की शाईचा ठिपका?  फुली दिसली की वाटते ही नुसतीच फुली आहे, की एक्स, की गुणिले चिन्ह, की चूक?