शेलची झेब्रा नावाची एक गाजलेली कविता आहे. झेब्रा ही थीम वापरून राजू देशपांडेने - हा सुभाष अवचटांचा चेला - या पुस्तकात काही सुंदर रेखाटने केली आहेत.
प्रकाशनाला अवचट पाहुणे म्हणून होते. यावरून आठवले. जी, एं. च्या 'इस्किलार' ला अवचटांनी चित्रे काढली होती व ती जी. एं. ना आवडलीही होती. पण त्या चित्रांनी 'इस्किलार' ला जवळजवळ खाऊनच टाकले अशी जी. एं. नि अवचटांकडे प्रेमळ तक्रार केली होती. राजूची चित्रे बाकी तिसरी रुपांतरीत कविताच म्हणावी इतकी शांत, सटल आहेत.