मुळात कायदा करावयाची वेळ का यावी?  मराठी माणसे आपल्या भाषेविषयी अजिबात आग्रही नाहीत. साधे बोलताना,  लिहिताना सुद्धा मराठीमध्ये / मराठी ऐवजी हिंदी,  इंग्रजीचा यथेच्छ वापर करतात.

त्यामुळे अन्य भाषा प्रेमींना वाटते इथे कोणतीही भाषा बोलली तरी हरकत नाही.  ह्यावर उपाय एकच.

कटाक्षाने सर्वत्र मराठी बोलायचे / मराठी शब्द वापरायचे.  उदा.  ट्रॅफिक ऐवजी वाहतुक, ट्रॅफिक जाम ऐवजी 
वाहतुक खोळंबा  ,  (सोहळा) संपन्न झाला ऐवजी सूप वाजले, उग्रवादीच्या ऐवजी अतिरेकी इ. इ.

अश्याने कायदा करण्याची वेळच येणार नाही.