उल्लेखलेली व्यायामशाळा ही खूप मोठी आणि प्रसिद्ध आहे. त्यामुळे येणऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. मॉल्स मध्ये तरी निदान आपण रोज जात नसतो. त्यामुळे जास्ती करून शनिवार/रविवारच तिथे पार्किंगचा मोठा प्रश्न असतो. पण व्यायामशाळेत  लोक रोजच येतात. असे असताना रोजच रस्ता अडवून पार्किंग करणे बरोबर नाही असे मला वाटते. शिवाय उच्चभ्रू आहेत असे दाखवण्यासाठी बरेच लोक इकडे चारचाकीतूनच येतात. त्यामुळे आणखिच प्रॉब्लेम येतो असे मला वाटते. महापालिकेनेच ह्यावर ठोस पावले उचलायला हवी.

तसेच तुम्ही म्हणता तसेही बरेच लोक करतात. एकाने गाडितच बसून राहायचे. म्हणजे पार्किंगचाही प्रश्न नको. अशा लोकांवर  महापालिकेने कारवाई करावी.