मुळात मराठीत बरोबर या शब्दाचे दोन प्रकारे अर्थ घेता येतात.
१. बरोबर: योग्य, रास्त
२. बरोबरः सह, सकट
आता यातला दुसरा अर्थ पहा. इथे बरोबरीने असा शब्द वापरला तर त्याचा अर्थ समान पातळीने असा होऊ शकतो. म्हणजे साधारण हिंदीतला बराबरी सारखा. म्हणजे समान, सारखा, सम असा अर्थ येतो.
म्हणून ज्या दोन शब्दांमध्ये = हे चिह्न असेल ते दोन्ही शब्द किंवा पदे, संख्या समान, आहेत असा अर्थ होतो.
योग्य ह्यासाठी आपण इंग्रजीत ज्याला टिकमार्क म्हणतात ते चिह्न वापरतो.
विवरण जरी अति असले तरी मला वाटतं भावना पोहोचल्या........... कृष्णकुमार द. जोशी