खास मैत्रीण,
पार्किंगची सोय नसल्याची कारणे पुढीलप्रमाणे असू शकतात.
१.पार्किंगची सोय करायला पाहिजे, हे संबंधितांना सुचले नसेल.
२.बांधकामे करताना पार्किंगची सोय करावी, असा कायदा नसावा.(माझी माहिती चुकीची असल्यास दुरूस्ती करावी)
३. स्वतःचा व्यवसाय खूप वाढणार आहे, याची कल्पना संबंधितांना आली नसावी.
पूर्वी (साधारण १९९० पूर्वी) जी काही बांधकामे होत असत, त्यात पार्किंग हा विचारच नसे.
कारण सोपे आहे. वाहनांची संख्याच समाजात अत्यंत कमी होती. गि-हाईकांच्या वाहनांचा विचार आपण का करावा, आपले काम गि-हाईकाशी... अशी मानसिकता होती. आता वाहनांची संख्या वाढली असल्याने संबंधित व्यवस्थापने पार्किंगचा विचार नक्की करत आहेत. उदा. मॉल्स व मल्टिप्लेक्स. प्रश्नांची तीव्रता वाढली की त्याबाबत विचार करावा लागतो.
आपण सुचविलेले उपाय योग्य आहेत. सर्व दृष्टीने हितकारक आहेत.