अवांतरः 
बरेचदा या हॉर्नचे वाजणे पुढील बाजूस असते. गाडी मागे जात असते. पण हॉर्न पुढे वाजतो. अत्यंत हास्यास्पद आहे.
मागील व्यक्तीने सरकावे, अशी अपेक्षा असते. हॉर्न पुढे वाजून काय उपयोग ?  
मला खालील गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत.
प्रत्येक कंपनीच्या गाडीचा रिव्हर्स हॉर्न पुढे वाजतो ?
ज्या गाड्यांचा हॉर्न पुढे वाजतो, त्यांच्या लक्षात ही बाब अद्याप कशी आली नाही ?
गाड्यांमध्ये एसी, टेपरेकॉर्डर आदी अनंत सोई केल्या जातात. ही सोय अद्याप कशी झाली नाही ?खरे तर ही सोय नाही, कॉमन सेन्स आहे.